“मार्गदर्शनसेतू”या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वयशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांच्यामध्ये सामंजस्य करार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । सातारा । जिल्ह्यातीलग्रामीण व शहरी भागातील शाळा, महाविद्यालय, आयटीआय, व्यवसाय शिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना, महिला बचत गट, यांना ‘उद्योजकीय संधी’ तसेच इतर विषयावर मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आणि इतर कार्यशाळा यांचे आयोजन करून पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने रोजगार,स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती देण्याच्या उद्देशाने “यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा”  आणि “जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा” यांच्यामध्ये मार्गदर्शनसेतूया नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सामंजस्य करार  करण्यात आला.

याद्वारे जिल्हयातील शाळा, महाविद्यालय, आयटीआय, व्यवसाय शिक्षण संस्था मधीलविद्यार्थी, औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचारी/अधिकारी, महिला बचत गटांतील महिला तसेच समाजातील विविध घटकांनारोजगार स्वयंरोजगार व नाविन्यता बाबत चालना देण्यासाठीयशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,सातारा यांच्याकडेउपलब्ध असलेले विविध क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक व वक्ते यांच्या मार्फत विविध विषयांवरती मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच याद्वारे व्यवसाय वित्त, विपणन धोरणे, व्यवस्थापन तंत्र इ. क्षेत्रात उमेदवारांचे कौशल्य वाढवण्यासाठी कार्यशाळा/प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केलेजाणार आहे. विशिष्ट उत्पन्न निर्माण करणार्‍या प्रकल्पांची उमेदवारांनामाहिती देऊन आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी मदत केली जाणार आहे.

यासाठीकौशल्यविभागामार्फतशाळा, महाविद्यालय, आयटीआय, व्यवसाय शिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना, इतर शासकीय संस्था महिला बचत गट किंवा इतर लाभार्थी उमेदवार यांच्याशी समन्वय साधून आगाऊ वेळापत्रक तयार करून तज्ञ वक्ते व प्राध्यापक यांच्या मार्फत मार्गदर्शन, करिअरमार्गदशन केले जाणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!