अज्ञात चोरट्याची मोटरसायकल राईड; गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य । दि. ७ ऑक्टोंबर २०२२ । सातारा । अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चालवून पाहतो, असे सांगून मोटरसायकलची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतीक प्रकाश जाधव वय 27 राहणार प्रतापगंज पेठ सातारा यांची केटीएम ड्युक कंपनीची मोटरसायकल क्र. एमएच 11 सीएक्स 2266 विकण्याची असल्याने त्यांनी याबाबतची जाहिरात ओएलएक्स वर टाकली होती. दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेला तसेच डोक्यात गुलाबी रंगाची टोपी घातलेला एक अज्ञात इसम हा जाधव यांच्याकडे आला. त्याने मला ही गाडी घेण्याची असून मी मोटरसायकल चालवून पाहतो, असे सांगून तो मोटर सायकलची राईड घेण्यासाठी गेला. तो पुन्हा मोटरसायकल घेऊन माघारी न आल्याने प्रतीक जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पो. हवा. जाधव करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!