
दैनिक स्थैर्य । 8 मार्च 2025। सातारा । बारावीत शिक्षण घेणार्या अल्पवयीन मेव्हणीवर दाजीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याशिवाय दाजीच्या मित्रानेही अश्लिल फोटो मोबाईलवर पाठविले नाहीतर आत्महत्या करेन अशी धमकीही दिली होती. व संबंधित फोटो दाजीला पाठविले होते. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित युवती अल्पवयीन असून दाजी व त्यांच्या मित्राविरुध्द पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती सातारा तालुक्यातील एका गावात बहिणीकडे शिक्षणासाठी आली होती. एके दिवशी दाजीचा अल्पवयीन मित्र घरी आला. त्याने अश्लिल फोटो मोबाईलवर पाठव नाहीतर मी तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून पीडित युवतीने त्याला फोटो पाठवले. हे फोटो त्या मुलाने दाजीला पाठवले. याचा गैरफायदा घेत दाजीने वेळोवेळी मेव्हणीवर अत्याचार केला. तसेच अत्याचाराचा प्रकार कोणास सांगितला तर तुझे फोटो सर्वांना पाठवेन अशी दाजीने धमकी दिली.
यामुळे पिडितीने अत्याचार सहन केला. तसेच धमकी देत दमदाटी करून पिडितेकडून चिठ्ठी लहून घेतली. यामुळे युवती घाबरली. अखेर अत्याचार सहन होत नसल्याने तिने सातारा पोलिस ठाण्यात धाव घेतली.