दहावीतील मुलाच्या अभ्यासाच्या टेन्शनमुळे आईची आत्महत्या


स्थैर्य, मेढा, दि.७: दहावीत असलेल्या मुलाच्या अभ्यासाचे टेन्शन आल्याने आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रुईघर, ता. जावली येथे घडली. सविता शाम निकम वय 35 असे तिचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, रुईघर येथील सविता शाम निकम यांचा सुशांत हा मुलगा दहावीला आहे. त्याच्या अभ्यासाबात सविता तणावात होत्या. यातूनच दि. 3 रोजी त्यांनी गवतावर टाकण्याचे औषध प्राशन केले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात पती शाम आनंदा निकम यांनी खबर दिली असून हवालदार शिंदे तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!