राज्यात एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळी योजनेचा लाभ


दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । मुंबई । राज्यातील गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या मोफत शिवभोजन थाळी योजनेचा 1 कोटींहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. 15 एप्रिल ते 28 जून या काळात 1 कोटी 7 लाख 59 हजार 90 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

15 एप्रिल 2021 ते 14 जुलै 2021 पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. असा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने 17 जून 2021 रोजी निर्गमित केला आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी ८६ लाख ९५ हजार ६८७ थाळ्यांचे वितरण झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 1332 शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात एकूण 1068 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत. उर्वरित केंद्रे लवकरच सुरु होतील.


Back to top button
Don`t copy text!