दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । आटपाडी । श्री . सिद्धनाथांच्या पालखी आणि सासनकाठी च्या मुख्य सोहळ्यादिनी बुधवार दि . २७ रोजी आटपाडी आगारातून मोठ्या प्रमाणावर बसेसची सोय करण्यात आल्याची माहीती आटपाडी आगाराचे आगार प्रमुख सदाशिवराव कदम यांनी विविध दैनिकांशी बोलताना दिली .
राज्य परिवहन महामंडळाचे सांगली विभागाचे विभाग नियंत्रक श्री सुनिल भोकरे यांचे मार्गदर्शनाखाली यात्रेसाठी च्या ज्यादा बसेस, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आम्ही केल्याचे आगार प्रमुखांनी स्पष्ट केले . आटपाडी ते खरसुंडी, खरसुंडी ते आटपाडी, खरसुंडी ते भिवघाट, भिवघाट ते खरसुंडी, आटपाडी ते सांगोला, आणि सांगोला ते आटपाडी अशा मार्गावर अनेक ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत .
खरसुंडीच्या श्री . सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी असून हजारो भावीक भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी आटपाडी आगाराने वाहतूकीची मोठी सोय केली आहे . आटपाडी बस स्थानकावर प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याचीही खास सोय या यात्रा काळात करण्यात आली आहे . याचा सर्व भावीक भक्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आगार प्रमुखांनी केले आहे .