दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
धोम-बलकवडी, भाटघर, नीरा-देवघर, वीर व गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला समाधानकारक नसली तरी सुरुवात झाली आहे, तथापि अद्याप मान्सून सक्रिय झाला नसल्याची चर्चा आहे. आगामी काळात उत्तम पाऊस होईल आणि सर्व धरणे भरतील, अशी अपेक्षा आहे.
२३ टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात १२ मि. मी. पाऊस झाला, आजपर्यंत १५४ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.५२ टीएमसी म्हणजे ६.४५ टक्के पाणीसाठा आहे.
१० टीएमसी क्षमतेच्या वीर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात ०.०० मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १२१ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.८९ टीएमसी म्हणजे २०.०९ टक्के पाणीसाठा आहे.
१२ टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरण परिसरात काल ३५ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १६२ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात १.०९ टीएमसी म्हणजे ९.३० टक्के पाणी साठा आहे.
४ टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरण परिसरात काल ५१ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत १८६ मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात ०.३६१ टीएमसी म्हणजे ९.७७ टक्के पाणी साठा आहे.
४ टीएमसी क्षमतेच्या धोम – बलकवडी धरण परिसरात काल ८४ मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत २४० मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात ०.०४ टीएमसी म्हणजे ०.९२ टक्के पाणी साठा आहे.