फलटण आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२५ | फलटण |
राज्य परिवहन महामंडळ ( एस.टी.) प्रतिवर्षी इंधन बचत मासिक कार्यक्रम राबवत असते. फलटण आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेज फलटणचे प्राध्यापक शंभूराज शिंदे व प्राध्यापक धनंजय सस्ते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

अध्यक्षस्थानी प्रभारी आगार व्यवस्थापक श्री राहुल वाघमोडे होते. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. शुभम रणवरे, वाहतूक निरीक्षक श्री. राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. सुखदेव अहिवळे, बहुसंख्य चालक – वाहक, कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. शिंदे व प्रा. सस्ते यांनी डिझेल बचत ही काळाची गरज असून, डिझेल पेट्रोलकरिता आपले परकीय चलन फार मोठ्या प्रमाणात खर्च होते. चालकांनी जास्तीत जास्त डिझेल वाचवून आपल्या देशाला आत्मनिर्भर केले पाहिजे, असे सांगितले. कार्यशाळा कर्मचार्‍यांनी बसेसची वेळोवेळी आवश्यक ती दुरुस्ती करून इंधन बचतीला हातभार लावावा, असेही ते म्हणाले.

यावेळी चालक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा फलटण आगाराच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!