दैनिक स्थैर्य | दि. २९ मे २०२३ | फलटण |
जिंती येथील एका महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दिलीप सदाशिव रणवरे (रा. जिंती, ता. फलटण) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. २७ मे २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला घरी एकटी असताना आरोपी दिलीप रणवरे याने तिचा विनयभंग केला व यावेळी झटापटीत महिलेच्या उजव्या कानातील कर्णफुले व गळ्यातील मनी मंगळसूत्र पडून नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात फिर्यादी महिलेने दाखल केली आहे.
या प्रकरणी अधिक तपास यादव करत आहेत.