दैनिक स्थैर्य | दि. २९ मे २०२३ | फलटण |
वाठार फाटा (ता. फलटण) येथे रस्त्यावर १९ मे २०२३ रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली असून हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (क्र.एमएच-४२-एजी-४५९१) चालकाविरोधात गणेश अशोक पवार (रा. पवार गल्ली, ता. फलटण) याने फिर्याद दिली आहे.
या अपघाताची अधिक माहिती अशी, १९ मे रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास वाठार निंबाळकर (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण ते सातारा जाणार्या रोडवर साईरत्न हॉटेलपासून थोडे अंतरावर वाठार फाटा येथे फिर्यादी गणेश पवार व त्याचा मित्र ऋतिक रविंद्र गोडसे (रा. रविवार पेठ, कुंभारगल्ली, पवार वाडा, फलटण) हे दोघेजण प्लाटीना मोटारसायकल (क्र. एमएच-११-सीएस-५९६९)वरून मिरगाव (ता. फलटण) येथे वेताळबाबा देवाचे दर्शनासाठी जात असताना समोरून पॅशन प्रो मोटारसायकल (क्र.एमएच-४२-एजी-४५९१) वरील चालकाने फिर्यादीच्या मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी झाले, तर त्यांचा मित्र ऋतिक रविंद्र गोडसे यास किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची चौकशी व्हावी, अशी विनंती फिर्यादी गणेश पवार यांनी केली आहे.
या प्रकरणी अधिक तपास स. पो. फौजदार सूर्यवंशी करत आहेत.