दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२३ | फलटण |
फलटण शहरातील मंगळवार पेठेतील एका महिलेचा लहान मुलांची भांडणे सोडवत असताना एकाने विनयभंग करून दोघींनी महिलेस अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शंकर ननवरे, ताराबाई शंकर ननवरे व राणी गणेश ननावरे (सर्व राहणार झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, २० मे रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणार्या महिलेच्या घरासमोर गणेश शंकर ननवरे, ताराबाई शंकर ननवरे व सौ. राणी गणेश ननवरे (सर्व राहणार झिरपे गल्ली) यांनी लहान मुलांची भांडणे सोडवत असताना महिलेस अश्लील शिवीगाळ केली व गणेश ननवरे याच्या अंगावर ढकलून दिले. यावेळी गणेश ननवरे याने त्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार शहर पोलिसात पीडित महिलेने दाखल केली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केणेकर करत आहेत.