दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । राहत्या घरापासून नजिकच्या शाळेत जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तीचा विनयभंग केला. याबाबत पिडीत मुलीने फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणी बागवान गल्ली, सदरबझार सातारा येथील परवेज आतार याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, फिर्यादी मुलीचा शाळेत असताना त्याने दुचाकीवरून पाठलाग करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे संबंधीत मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास उपनिरीक्षक मोटे हे करत आहेत.