दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा शहरांमध्ये दहशत माजवणाऱ्या बकासुर गँगचा टोळीप्रमुख यश नरेश जांभळे यांच्यासह 16 जणांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे या संदर्भातील आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिले आहेत.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आर्थिक फायदा करता संघटित गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम कायद्यानुसार प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या . दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता कौंतेय कॉम्प्लेक्स प्रतापगंजपेठ येथे आरोपी यश जांभळे व त्याच्या इतर सोळा साथीदार व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी आर्यन विशाल कडाळे यास हप्ता देत नाही म्हणून बेदम मारहाण केली होती त्यानंतर यश जांभळे यांनी भर दिवसा आणि याचे गल्लीत जाऊन त्याच्यावर चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता बकासुर गँगमधील यश जांभळे व त्याचे साथीदार यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
टोळीप्रमुख यश जांभळे यांनी बकासुर गँगची दहशत पसरवण्यासाठी सातारा शहरातली इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करून त्यांची दहशत पसरवल्याचे निष्पन्न झाले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी टोळी विरुद्ध दाखल गुन्हे यांची माहिती संकलित करून टोळीप्रमुख यश नरेश जांभळे टोळी सदस्य राहुल बर्गे व 19 राहणार दिव्य नगरी शाहूपुरी, पेट्या उर्फ गौरव अशोक भिसे वय 20 राहणार ढोर गल्ली सातारा, ऋषिकेश उर्फ शुभम हनुमंत साठे गुरुवार पेठ ढोर गल्ली, अनिकेत उदय माने राहणार शनिवार पेठ सातारा, आदित्य सुधीर जाधव राहणार भैरोबाचा पायथा शाहूपुरी, शंतनु राजेंद्र पवार राहणार आरफळ तालुका जिल्हा सातारा, अनिकेत सुभाष पारशी , सुनील माणिकराव शिरतोडे राहणार कोरेगाव,एक अनोळखी व सात विधी संघर्षग्रस्त बालक यांचे विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम आणि कारवाई करण्याकरता पोलीस अधीक्षक सातारा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांच्याकडे देण्यात आला आहे हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक गणेश शाखेचे पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे अभिजीत यादव अमित सपकाळ हसन तडवी लैलेश फडतरे अमित माने स्वप्निल कुंभार ओंकार यादव मिथुन मोरे विजय कांबळे अमृत वाघ सतीश बाबर सुनील भोसले स्वप्निल सावंत यांनी या कामांमध्ये सहकार्य केले.