सैदापुरात महिलेचा विनयभंग


 

स्थैर्य, सातारा, दि. 30 : सैदापूर परिसरात एका इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सातारा तालुका पोलिसांनी प्रमोद शिंदे (रा.करंजे) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पीडित महिला ही एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. दि. 14 जून ते 17 जुलै दरम्यान संशयिताने तिला वेळोवेळी रस्त्यावर अडवून तू मला आवडतेस, तू मला साथ दे, माझ्या गाडीवर बसून चल, तुला घरी सोडतो, असे म्हणत व ती काम करत असलेल्या इरमारतीच्या गेटवर असलेले रजिस्टर तपासण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. पुढील तपास हवालदार जाधव हे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!