लोंगेवाला पोस्टवरून मोदींचा चीन आणि पाकिस्तानला इशारा, म्हणाले – …तर चोख प्रत्युत्तर मिळेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि १४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी जैसलमेरमध्ये लोंगेवाला पोस्टवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. ते म्हणाले की, सीमेच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच कोणी जर भारताला आजमावण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल अशा शब्दांत चीन आणि पाकिस्तानला कडक इशारा दिला. यावेळी मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.़

तुम्ही आहात म्हणून देशातील लोकांचा आनंद आहे

पंतप्रधान म्हणाले की, मी तुमच्यासाठी प्रत्येक देशवासीच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे. मी प्रत्येक ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे. आपण सर्व शुभेच्छा देण्यास पात्र आहात. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा दिवाळी साजरी करण्यासाठी सियाचिनला गेलो होतो. त्यावेळी लोकांना आश्चर्य वाटले. पण तुम्हाला माहित आहे, मी दिवाळीत आपल्या लोकांमध्ये नाही येणार तर कुठे जाणार. यामुळे आजही मी आपल्यांमध्ये आलो आहे. तुम्ही बर्फाच्छदित डोंगरात असो किंवा वाळवंटात, तुमच्या चेहऱ्यावरील रौनक पाहिल्यानंतर माझी दिवाळी शुभ होते.

प्रत्येकाला लोंगेवाला पोस्टचे नाव माहीत आहे

मोदी म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाला लोंगेवाला पोस्टचे नाव माहीत आहे. येथे उन्हाळ्यात तापमान 50 अंश तर हिवाळ्यात शून्यावर पोहोचते. लोंगेवालाचे नाव घेताच मनातून आवाज येतो – जो बोले सो निहाल, सत श्री अकाल.

लोंगेवालामध्ये आपल्या सैनिकांनी पाकला धूळ चारली

जेव्हा जेव्हा लष्करी इतिहास लिहिला जाईल तेव्हा बॅटल ऑफ लोंगेवालाचे नाव लिहिले जाईल. जेव्हा पाकिस्तान सैन्य बांगलादेशी (त्यावेळी पूर्व पाकिस्तान) लोकांना संपवत होते. तेथून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या पश्चिम सीमारेषेवर मोर्चा वळवला होता. परंतु तेच त्यांच्या अंगलट आले. इथल्या पराक्रमाच्या प्रतिध्वनींनी पाकिस्तानच्या विचारांना चिरडले. आई भारतीच्या मुलाचा सामना करावा लागणार हे त्याला माहित नव्हते. मेजर कुलदीप सिंह चांदीपुरी यांनी शत्रूला धूळ चारळी.

मोदींचा सैनिकांना संदेश

या उत्सवांच्या काळातही आपल्या भारत मातेची सेवा आणि सुरक्षा करण्याऱ्या सीमेवर तैनात शूर सैनिकांना लक्षात ठेवून सण साजरे करायचे आहेत. भारत मातेच्या या शूर मुला-मुलींच्या सन्मानार्थ आपल्याला घरात दीप प्रज्वलित करायचे आहेत. मी आपल्या शूर जवानांना सांगू इच्छितो की, तुम्ही सीमेवर असले तरीही संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आज ज्या कुटुंबातील मुले व मुली सरहद्दीवर आहेत त्यांना मी अभिवादन करतो. प्रत्येक व्यक्ती जो देशाशी संबंधित काही जबाबदाऱ्यांमुळे घरी नाही, ते आपल्या कुटूंबापासून दूर आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

6 वर्षात कुठे दिवाळी साजरी केली

2019 : पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेवर (LoC) वर तैनात सैनिकांसोबत दिवाळी साजारी करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले होते की, युद्ध किंवा घुसखोरी, या प्रदेशाला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो, परंतु हे स्थान नेहमीच त्या त्रासातून बाहेर पडते. या क्षेत्राने कधीही पराभव पाहिला नाही

2018: यावर्षी पंतप्रधान उत्तराखंडमध्ये केदारनाथच्या दर्शनासाठी गेले होते. येथे त्यांनी चीन सीमेजवळील हर्सिल गावच्या केंट भागात भारतीय सशस्त्र सेना आणि आयटीबीपी जवानांची भेट घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, बर्फाच्छादित क्षेत्रात कर्तव्याचे आपले समर्पण देशास बळकट करते. आपल्यामुळे, 125 कोटी लोकांची स्वप्ने सुरक्षित आहेत.

2017: यावर्षी मोदींनी जम्मू-काश्मीरच्या गुरेज भागात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.

2016 : यावर्षी मोदींनी हिमाचल प्रदेशातील चीन सीमेजवळ इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांसह दिवाळी साजरी केली.

2015: यावर्षी पंतप्रधानांनी अमृतसर (पंजाब) सीमेवर सैनिकांसह दिवाळी साजरी केली.

2014: सियाचीनमधील सैनिकांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!