दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | फलटण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड अंतर्गत लॉकडाऊन च्या काळात कृषिदूतांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. तसेच शेतकर्यांना शेतीपयोगी मोबाईल अॅप्स व त्यांच्या वापराबद्दल माहिती करून दिली.
या उपक्रमांतर्गत कृषिदूत उमेश दडस आणि कृषिदूत विशाल दडस यांनी प्रत्यक्ष कृतीतून बीजप्रक्रिया व त्याचे फायदे, माती परीक्षण का करावे, नवीन आवाजारांची ओळख, पीक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजना, फळझाडाचे कलम कसे करावे, जैविक खतनिर्मिती, कीड रोग नियंत्रणासाठी कीडनाशकांची फवारणी, तणनाशकांचा वापर आणि पिकांमधील अन्नद्रव्य कमतरता याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली.
या उपक्रमासाठी कृषिदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कार्यक्रम प्रमुख प्रा.एन.एस. ढालपे, प्रा.ए. एस.नगरे, डॉ. व्ही. पी. गायकवाड, प्रा. एस. वाय. लाळगे व इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.