पालघरमध्ये मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

१२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थैर्य,पालघर, दि. 11 : पालघरमध्ये मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात वाडा पोलीस आणि पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून एका गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाडा तालुक्यातील कुडूस येथील बाजारपेठेतील मॅंगो मोबाईल शॉपी हे मोबाईलचं दुकान फोडून ११ लाख ६६ हजार किंमतीचे मोबाईल, २ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम व १० हजार रुपये किंमतीची डीव्हीआर मशीन असा सुमारे १३ लाख ९१ हजार किमतीचा ऐवजी लंपास केल्याची घटना २० मे रोजी घडली होती. या गुन्ह्याचा तपास वाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी संयुक्तरित्या करत होते. या गुन्ह्यात पोलीसांनी भिवंडी येथून तीन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी चोरी केलेले सुमारे १२ लाखांचे मोबाईलही पोलीसांनी हस्तगत केले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी यांनी दिली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!