तळीये येथे ग्रामस्थांसाठी फिरता दवाखाना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फिरत्या दवाखाना आरोग्य वाहिनी सेवेच्या वेळी ओंकार चव्हाण सह ग्रामस्थ उपस्थित होते...

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. ३ (रणजित लेंभे) : कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील तळीये येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्यादृष्टीने गैरसोय होऊ नये याकरिता सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्तीचे अध्यक्ष ओंकार चव्हाण यांनी पुढाकार घेऊन फिरता दवाखाना हा उपक्रम हाती घेतला होता याचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामीण स्तरावरील जीवनमान विस्कळीत झालेले आहे. कोरोनाच्या भीतीने छोट्या छोट्या गावांत आरोग्य व दैनंदिन गोष्टींसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.आरोग्य उपचारासाठी सुमारे पाच ते सहा किलो मिटर मुख्य बाजार पेठेत जावे लागतं आहे.त्यामध्ये वयस्कर लोकांना आणि लहान मुलांच्या आरोग्य विषया संदर्भात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्यतः खाजगी दवाखाना उपचार वेळेत मिळवणे आत्ता गैरसोयीचे झाले आहे. तसेच अनेक ग्रामस्थ यांबाबत गर्दी बरोबर वैद्यकीय सेवेकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाण्याचे टाळत आहे. त्याचं प्रमाणे तोंडाला मास्क लावणे, स्वच्छतेसह लॉंग डिस्टन्सचा, अंतराचा वापर करणे, अनावश्यक गर्दी टाळणे,या आरोग्य विभागासह शासनाने  घातलेल्या नियमाचे पालन करावे लागत आहे.ही गैरसोय लक्ष्यात घेऊन कोरेगाव तालुक्यातील तळीये गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष ओकांर चव्हाण यांच्या पुढाकाराने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व कृषीउत्पन्न बाजारसमितीचे चेअरमन रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्या माध्यमातून गावांत फिरता दवाखाना चालू करुन ग्रामस्थांच्या प्राथमिक स्तरावर असणाऱ्या आरोग्य बाबतची तपासणी व उपचार केले जात आहे.या आरोग्य वाहिनीच्या सहाय्याने डॉक्टर,नर्स सहाय्यक टीम काम करीत असून,शासनाने दिलेल्या आरोग्याच्या नियमाचे काटेकोर पालन करीत,लोकांना आरोग्याच्या समस्येचे निराकरण केले जात आहे. या उपक्रमाचे गावातून सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी ओंकार चव्हाण,सत्यवान चव्हाण,सर्जेराव चव्हाण,सुधाकर चव्हाण,सुधीर लोखंडे,प्रशांत देशमुख,गणेश चव्हाण अक्षय चव्हाण शुभम लोखंडे उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!