
दैनिक स्थैर्य । 14 एप्रिल 2025। फलटण । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण सर्वांनी अंमलात आणले पाहिजेत, असे मत सुद्धा यावेळी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने यावर्षी डॉ. आंबेडकर यांचा 134 वा जयंती महोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.