आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते 600 घरकुलांचे वाटप

’सर्वांसाठी घर’ या योजनेतून फलटण तालुक्यासाठी 3500 घरकूल मंजूर


दैनिक स्थैर्य । 4 जून 2025। फलटण । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ’सर्वांसाठी घर’ या योजनेतून फलटण तालुक्यासाठी 3500 घरकूल मंजूर झाली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 600 घरकुलांचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

घरकुल योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवराजसिंह चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे फलटण तालुक्यात एकूण 3500 घरकुलं मंजूर झाली आहेत.

या कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांनी आपल्या पक्क्या घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद व्यक्त केला. या घरकुल योजनेमुळे फलटणमधील अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना निवारा मिळाला असून, त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. सरकारच्या ’सर्वांसाठी घर’ या अभियानाचा हा भाग असून, यामध्ये लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!