स्थैर्य, वाई,दि. 30 : वाई तालुक्यातील पश्चिम भागातल्या गावात करोना बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी त्या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांना धीर दिला. कोरोनाला हरवायचे आहे.आपला गाव, आपला तालुका आपल्याला करोना मुक्त करायचा आहे.त्याकरता आपण प्रत्येक ग्रामस्थांनी थोडेसे नियम पाळणे जरुरीचे आहे. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी हा मकरंद आबा खंबीर आहे, अशा शब्दात आमदार मकरंद पाटील यांनी ग्रामस्थांना आधार देत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मुंगसेंवाडी येथील एकाच कुटूंबातल्या दोन जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आला असून वाई तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता 41 वर गेली आहे.तर वाई शहरातील ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांच्या सहवासात आलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते.
वाई तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबईहुन आलेल्या नागरिकांमुळे कोरोना बाधित होत आहेत.
जांभळी, आसरे, मालतपूर, आसले, दह्याट, परतवडी, धावडी, देगाव, आकोशी या गावांचा समावेश असल्याने गावागावात भीतीचे वातावरण आहे.मात्र,स्थानिक कोणीही करोना बाधित ग्रामस्थ नाही वा नवीन साखळी तयार होत नाही.
जांभळी खोऱ्यात वाढते रुग्ण पाहून आमदार मकरंद पाटील यांनी जांभळी, वडवली, किरूंडे, वेरुळी, कोंढावळे, वासवली या गावांना भेट दिली. त्यांच्यासोबत तहसीलदार भोसले, गटविकास अधिकारी कुसुरकर, तालुका वैधकीय अधिकारी डॉ.सुनील यादव, मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार मकरंद पाटील यांनी लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. ते म्हणाले, वाई तालुक्यातील या जांभळी खोऱ्याने याच्या अगोदर पाळले गेले आहे. प्रत्येक गावागावात आता मुंबईवाले आले आहेत. या मुंबईवाल्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. स्थानिकांनी आपलेच भावबंद आहेत. करोना हा आजार मोठा नाही. जे बाधित आहेत ते बरे होऊन येतील. तोपर्यंत प्रत्येकांनी आपल्या गावाची आपली काळजी घेणे आवश्यक आहे. येणाऱ्या अडचणी सोडवायला मी आहे. परंतु आता नियम पाळा, सामाजिक अंतर ठेवा, असे आवाहन केले. आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नागरिकांनी ही अडचणी मांडल्या. आमदार मकरंद पाटील यांनी तब्बल एका दिवसात तालुक्यातील शंभर ते दीडशे किलोमीटरचा दौरा केला. ग्रामस्थांना आधार दिला.
ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेम करणारा कर्मचारी चक्क स्वाब घेण्यासाठी होता. त्याने घरात काळजी घेतल्याने जे जे त्यांच्या सहवासात आले त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकण्यात आला. दरम्यान, वाई तालुक्यातील ज्या मुंबईहुन आलेले बाधित सापडत आहेत. नवीन साखळी तयार होत नाही.त्याची दक्षता घेतली जात आहे.
वाई शहरातून मांढरदेव बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याला मुंगसेवाडी हे छोटेसे गाव आहे. या गावात दि.21रोजी मुंबई हुन एक कुटुंब आले होते. त्या कुटूंबातल्या दोघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे मुंगसेवाडीकर चिंतेत असून गाव सील करण्यात आले आहे. वाई तालुक्यात बधितांची संख्या आता 41 झाली आहे.
वाई तालुका कोरोना बाधित संख्या..बाधित 41.मृत 3मुक्त 0उपचार 38