किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील; उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । सातारा । किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे आज सकाळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला या निवडीनंतर कारखान्यावर संपुर्णपणे मकरंद पाटील यांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे यापुढे किसनवीर च्या कारखान्याची प्रगती आणि कर्जमुक्ती याची कमान मकरंद पाटील कशा पद्धतीने सांभाळणार हा राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकतेचा विषय आहे.

नुकत्याच पार पडलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनलने कारखान्याचे 21 जागा जिंकत माजी आमदार मदन दादा भोसले यांच्या पॅनलचा दहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला . भोसले यांना भाजपामधून राजकीय पाठबळ मिळाले मात्र त्यांना कारखान्याची सत्ता टिकवता आली नाही या निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते यामध्ये आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसनवीर बचाव शेतकरी विरुद्ध माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली या निवडणुकीत चार आमदार आणि एक सभापती यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकीय वर्तुळात या निवडणुकीची जोरदार चर्चा झाली आमदार मकरंद पाटील यांना भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ मिळाली तर मदन भोसले यांना कोरेगाव चे आमदार महेश शिंदे भाजपचे पाठबळ मिळाले तरी पाच तालुक्यातील 52 हजार शेतकरी सभासद आणि मकरंद पाटील व नितीन पाटील बंधूंवर विश्वास दाखवत त्यांच्या हातामध्ये किसन वीर कारखान्याची कमान सोपवली.

प्रतापगड खंडाळा आणि किसन वीर या कारखान्यांच्या कर्जाचे ओझे हलके करण्याचे प्रयत्न आणि त्यासाठी दिलेल्या शब्द या गोष्टी मकरंद पाटील यांना कसोशीने पाळावे लागणार आहे त्या पद्धतीने आमदार पाटील यांनी 100 कोटी रुपयांच्या भागभांडवल याचे उद्दिष्ट समोर ठेवून हा निधी उभारण्यासाठी सुरुवात केली आहे.


Back to top button
Don`t copy text!