मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार अनिल (भाऊ) बाबर व कुटुंबियांचे सांत्वन


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । विटा । आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे दि. ३ ऑगस्ट रोजी निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाबर कुटुंबियांची विटा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना या दु:खातून सावरण्यासाठी धीर दिला.

यावेळी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शोभाताई बाबर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच बाबर कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना या दु:खातून सावरण्यासाठी धीर दिला. यावेळी आमदार अनिल बाबर यांच्यासह चिरंजीव सुहास व अमोल, स्नुषा शीतल व सोनिया , नातवंडे शौर्य, राजवीर, रणवीर, रणदिप यांच्यासह बाबर कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!