अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । सातारा । पुणे बेंगलोर महामार्गावर गाडीस धडक देऊन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 12 ऑगस्ट रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कराड गावच्या आधी समृद्धी ढाब्याच्या समोर पुणे बेंगलोर महामार्गावर शिवाजी बंडू मराठे व 44 राहणार जय हिंद रेसिडेन्सी पुणे हे त्यांच्या ताब्यातील गाडी क्र. एम एच 14 जीएस 89०३ कराड बाजूकडे जात असताना पाठीमागून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच 50 एम 5077 हा भरधाव वेगात आला. या ट्रक वरील चालक सुरज रशीद नदाफ वय 28, राहणार काले, तालुका कराड यांनी त्याच्या ताब्यातील ट्रक हा मराठे यांच्या गाडीच्या उजव्या बाजूस धडकवून गाडीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!