मिस युनिव्हर्स टूरिझम श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । मुंबई । मिस युनिव्हर्स टूरिझम आणि मिस एशिया विजेत्या श्रिया परब यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांचे ही स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनिल प्रभू, शिवानी परब, संजय परब, आदित्य परब, ऋषिकेश मिराजकर उपस्थित होते.

श्रिया परब यांनी राज्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाला सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!