रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना केले आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, 29 : स्थलांतरित नागरिक आपल्या घरी परत जाऊ शकतील हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे संपूर्ण देशभर दररोज श्रमिक विशेष गाड्या चालवित आहे.  असे निदर्शनास आले आहे की, आधीच आजारांनी ग्रस्त असलेले लोकं देखील या सेवेचा लाभ घेत आहेत ज्यामुळे कोविड-19 महामारीच्या काळात त्यांच्या आरोग्याला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. आधीच आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचा या प्रवासादरम्यान मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना देखील घडत आहेत.

​अशाच काही लोकांच्या सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाच्या, दिनांक 17 मे 2020 च्या आदेश क्रमांक 40-3/2020-DM-I (A) नुसार रेल्वे मंत्रालयाने आधीच आजारांनी ग्रस्त असलेल्या (उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, कमी रोगप्रतिकार शक्ती) व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, 65 वर्षांहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आवश्यकता नसेल तोपर्यंत रेल्वेने प्रवास करणे टाळावे असे आवाहन केले आहे.

​देशातील सर्व नागरिक ज्यांना प्रवास करणे गरजेचे आहे त्यांना रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे कुटुंब चोवीस तास कार्यरत आहे. परंतु आमच्या प्रवाशांची सुरक्षितता ही आमच्यासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. म्हणूनच, या संदर्भात आम्हाला सर्व नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. कृपया कोणतीही समस्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपल्या रेल्वे कुटुंबांशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. भारतीय रेल्वे आपली सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहे. (हेल्पलाइन क्रमांक – 139 आणि 138)


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!