गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । सातारा। पाटण तालुक्यातील प्रलंबीत तसेच वन विभागाकडे मंजुरीसाठी असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी घेऊन विविध सूचना केल्या.

येथील विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये जे रस्ते वन विभागाच्या हद्दीतून जात आहेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जे रस्ते वन विभागाच्या हद्दीतून जात आहेत त्या रस्त्यांचा प्रस्ताव तयार करुन मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी ऊरुल लघु पाटबंधारे कामाचा आढावा घेऊन या प्रकल्पाचे काम सुरु करण्याबाबत विविध सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.


Back to top button
Don`t copy text!