वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करावयाच्या कामांचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । सातारा । वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करावयाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2021-22 अंतर्गत ज्या ज्या विभागांना निधी प्राप्त झाले आहे तो वेळेत खर्च करा. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 ग्रामीण रस्त्यांसाठी जास्तीच्या निधीची मागणी करावी. तसेच जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे यासाठीही निधीची मागणी करावी, अशा सूचना करुन गृह, कौशल्य विकास विभागाचा प्राप्त निधी व खर्चाचा आढावा घेतला.


Back to top button
Don`t copy text!