मंत्री अस्लम शेख आणि भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, विधानभवन दि. ०४ : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागण्यांच्या सत्रामध्ये राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना.अस्लम शेख आणि भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली.  काही दिवसांपुर्वी मालवणीमध्ये राम मंदीर बांधणीसाठी देणगी देण्याचे आवाहन करणारे बॅनर्स पोलीसांनी फाडल्याचा  व याबद्दल जाब विचारायला गेलेल्या भाजपा  पदाधिकाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप करणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांना प्रत्युत्तर देताना ना. अस्लम शेख म्हणाले की, ज्या मुंबई पोलीसांची तुलना लंडनच्या ‘स्काॅटलंड यार्ड’शी केली जाते, त्यांच्यावर केवळ  स्वत :च्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणं योग्य नाही.
शेख यांनी लोढांच्या मालवणीमधील  हिंदू पलायणाच्या मुद्द्याचा खरपुस समाचार घेताना ज्या मतदारसंघामध्ये तिन लाख मतदारांपैकी २ लाख ३० हजार पेक्षा जास्त मतदार हिंदू आहेत. तिथे हिंदू अल्पसंख्यक असे काय असू शकतात असा सवालही ना. शेख यांनी विचारला.
लोढा यांनी बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा काढताच अस्लम शेख यांनी  भाजपा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष हा बांग्लादेशी घुसखोर असल्याचा आरोप केला. यावर हे सत्य असेल तर मी राजिनामा देईन असं म्हणत हे जर खोटं असेल तर तर अस्लम शेख यांनी राजिनामा द्यावा असं आव्हान लोढांनी शेख यांना दिलं.
काही दिवसांपुर्वी रुबेल शेख नावाच्या बांग्लादेशी घुसखोरास पोलीसांनी त्याच्या राहत्या घरी अटक केली होती. चौकशीअंती हा युवक भाजपा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष असल्याचं स्पष्ट झालं होतं.
शेख यांना विधानसभेत आव्हान देणारे लोढा आता आपल्या आमदारकीचा राजिनामा देणार का… ? हे पाहणं औत्सुक्याचं  ठरणार आहे.

Back to top button
Don`t copy text!