दापोली तालुक्याचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या २ ड्रीम प्रोजेक्टसाठी मिहीर महाजन यांनी घेतली मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. १४ जानेवारी २०२३ । दापोली । दापोली तालुक्यातून महर्षी कर्वे, पां.वा.काणे असे भारतरत्न याशिवाय लोकमान्य टिळक, साने गुरूजी, व्रँगलर परांजपे अशी अनेक नररत्न घडली आहेत. तसेच शेजारील आंबडवे हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव.
या नररत्नांचा सन्मान ठेवत एक भारत रत्नांचे थीम पार्क दापोलीत करावे अशी मागणी मिहीर महाजन यांनी आमदार सौ.उमा ताई खापरे यांच्या मार्गदर्शनात केली आहे.
विशेष महत्वाची बाब म्हणजे या भेटी दरम्यान हर्ने येथील ऐतिहासीक सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या विकासाबाबत देखील चर्चा झाली. गोवा फोर्ट – सुवर्णदुर्ग रोप वे उभारण्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार उमाताई खापरे यांनी सुधीर भाऊना विनंती केली असता ; त्वरित मा.मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री मा.नितीन गडकरी जी याना संबंधित शिफारस करणारे पत्र* तयार करून पुढे पाठवले आहे.
यावेळेस मा.मंत्री महोदयांनी तरुणांनी आपापल्या भागाच्या विकासासाठी असेच प्रयत्नशील राहण्याचे आवश्यक असल्याचे नमुद केले.

Back to top button
Don`t copy text!