रुग्णाच्या बाधित अहवालानंतर म्हसवड शहर झाले लॉक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड, दि.२८ : येथील भरवस्तीत राहणाऱ्या ५८ वर्षीय पुरुषाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने म्हसवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाने दि.२९ रोजी म्हसवडकर नागरीकांच्या उपस्थितीत एक बैठक घेवुन पुढील १४ दिवसांकरीता म्हसवड शहर पुर्णपणे लॉक ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला.

म्हसवड शहरात आज सापडलेल्या बाधित रुग्णाची हिस्ट्री तपासण्याचे काम प्रशासनाने जलद गतीने सुरु करीत बाधित रुग्णाच्या निकटवर्तीय १४ जणांना क्वारंटाईन केले आहे. तर बाधित रुग्ण हा पूणे जिल्ह्यातील बारामती नजीक पंदारे येथे एका महाराजांना निमंत्रण द्यायला गेला असल्याची माहिती समोर येत असुन त्याठिकाणीच या पुरुषाला लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबधीत पुरुष हा शहरातील एक नामांकित असल्याने त्याचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबध आहेत त्यामुळे अनेकांच्या काळजीत भर पडली आहे. विशेष म्हणजे हा पुरुष धार्मिक वृत्तीचा असल्याने गत काही दिवसांपासुन त्याच्या समाजाच्या मंदिरात रोज दर्शनासाठीही जात होता अशी माहिती समोर येत आहे. सध्या मंदिर बंदच राहतील असे जरी शासनाने जाहिर केले असले तरी गत काही दिवसांपासुन या समाजाने बैठक घेवुन समाजबांधवांसाठी मंदिर पाठीमागच्या दरवाजातुन फक्त दर्शनासाठी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याची खमंग चर्चा याच समाजाच्या बांधवामध्ये सुरु आहे. शहरात एक पाॅझीटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वांना धक्काच बसला असुन या पाॅझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील घरातील दहा जनांसह एक डाॅक्टर,घर काम करणारी महिला, दोन ड्रायव्हर व इतर तिन असे हायरिस्क मधील लोक संपर्कात आल्याने त्यांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे तर संबधीत व्यक्ती आणखी कितीजनाच्या संपर्कात  आला यांचा सर्व्हे पालिका व आरोग्य विभाग करत आहे. दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता प्रशासनाने तात्काळ बाधित सापडलेल्या परिसराला भेट देवून संपर्कात येणार्यांची माहिती घेत बैठक घेऊन ३०० मिटरचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला तर म्हसवड शहर अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचा निर्णय घेत माणच्या तहसीलदार बाई माने यांनी म्हसवड पालिका, आरोग्य विभाग व पोलिसांना यांना आदेश दिले.

दरम्यान ५८ वर्षीय पुरुष सहा दिवसांपुर्वी आजारी पडल्याने त्यांच्यावर घरातील डॉक्टर मुलाने उपचार केले मात्र फरक काहीच पडेना म्हणून म्हसवड येथील एका हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी अॅडमिट झाले होते त्यानंतर घरीच घरच्या डाॅक्टरने उपचार सुरु केले होते चार दिवसा पूर्वी जास्त झाल्याने सातारा येथे उपचारासाठी खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरु होते काल शनिवारी रात्री साडे सात वाजता तो पुरुष बाधीत झाल्याचे जाहिर झाल्या नंतर म्हसवडकरांना एकच धक्का बसला असुन बांधीत पुरुषाच्या मुलाचे  बाजार तळा नजीक हाॅस्पिटल आहे, एका भावाचे नाथ मंदिरा नजीक एक दुकान आहे तर दुसरे दुकान म. फुले चौकात असुन बाधीताचे घर भर वस्तीत असल्याने कंटेन्मेंट झोन करण्यात मोठी आडचण येत होती अखेर प्रशासनाने तलाठी कार्यालयात  बैठक घेऊन १४ दिवस म्हसवड शहरातील सर्व व्यवहार अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्याची तातडीने  उपाय योजना करत शहरातुन फिरुन  दुकाने १४ दिवस बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले त्यास म्हसवडकरांनी तात्काळ प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवण्यात केली.

यावेळी तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, स.पो.नि. गणेश वाघमोडे, आरोग्य सेविका पिसे, तलाठी उत्तम आखडमल, पालिकेचे कर्मचारी सागर सरतापे , विभुते मॅडम, इंजिनियर देशमाने,गटनेते धनाजी माने, गणेश रसाळ, केशव कारंडे, कैलास भोरे, संजय टाकणे, राहुल मंगरुळे आदी नागरीक उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!