दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । सातारा । उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा करिता नव्याने नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी एमएच 11-DH (0001 ते 9999) ही मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवरती दि. 5 सप्टेंबर 2022 पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
एका पेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रक्कमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल (विहित शुल्क धनाकर्षा व्यतिरिक्त )त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत देण्यात येतील. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांच्याशी संपर्क साधावा.