दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । एमजी सारथी उपक्रमांतर्गत एमजीने एमजी ग्राहकांच्या ड्रायव्हर्सना प्रशिक्षित व अपस्किल केले. हा उपक्रम ड्रायव्हर्सना सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिक) दृष्टीकोनांतर्गत एमजी कार्समध्ये सादर करण्यात आलेल्या प्रगत तंत्रज्ञानांची ओळख करून देतो. त्यांना सुरक्षित वाहनकार्यसंचालनांमधील आधुनिक विकासाबाबत माहिती दिली जाते. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या समारोहामध्ये अंधेरी येथील डेप्युटी आरटीओ अधिकारी श्रीमती पल्लवी कोठावडे यांनी उपस्थित राहत कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सहभागींना सन्मानित केले.
आतापर्यंत एमजीने एमजी सारथी उपक्रमांतर्गत पश्चिम प्रांतामधील २००० हून अधिक ड्रायव्हर्सचे अपस्किलिंग पूर्ण केले आहे. ग्राहक जवळच्या डीलरशिपमध्ये मोफतपणे प्रशिक्षणासाठी त्यांच्या ड्रायव्हर्सना साइन अप करू शकतात. इलेक्ट्रिक आणि कनेक्टेड वाहनांच्या सादरीकरणामुळे भारतीय वाहन उद्योगाचा चेहरामोहरा बदलला असल्याने नेक्स्ट-जनरेशन तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ड्रायव्हर्सना वैशिष्ट्ये आणि फायदे माहित असणे आवश्यक आहे.