एमजी मोटरने ‘माय एमजी शिल्ड’ लॉन्च केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.५: एमजी मोटर इंडियाने ग्लॉस्टर या भारतातील पहिल्या ऑटोनॉमस लेव्हल१ प्रीमियम एसयुव्हीसाठी आज देशातील पहिला वैयक्तिक कार मालकीचा उपक्रम माय एमजी शिल्ड लाँच केला आहे. ग्लॉस्टर सोबतच्या माय एमजी शिल्डमध्ये मालकीनंतरचा कालावधी, किलोमीटरचे मोजमाप आणि इतर प्राधान्यानुसार माहितीविषयक विक्रीनंतरच्या गरजा पूर्ण केल्या जातील. व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच रोड साइड असिस्टन्स, मेंटेनन्स, शिल्लक मूल्याची हमी, अॅसेसरीज, मर्चंडाइज इत्यादी २०० प्रकारचे वॉरंटी कॉम्बिनेशनमध्ये ग्राहकांना शांततापूर्वक सुविधा मिळण्याची सुनिश्चिती या उपक्रमाद्वारे होईल.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राजीव छाबा म्हणाले, “प्रत्येकाच्या आपापल्या कारसाठीच्या वेगळ्या गरजा असतात, हे आम्हाला एमजी कंपनीत कळाले. हेच तत्त्व माय एमजी शिल्ड च्या केंद्रस्थानी असून, याद्वारे वैयक्तिक आणि लवचिक ओनरशिप पॅकेज दिलेले आहे. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार, त्यांच्या ऐच्छिक विक्रीनंतरच्या गरजा निवडण्यास मदत होईल. हायपर वैयक्तिकृत युगात प्रवेश करण्याकरिता हा उपक्रम ग्राहकांना मदत करेल. कारण यात २०० पेक्षा जास्त पर्याय निवडण्यासाठी आहेत.”

ग्लॉस्टर ही एका स्टँडर्ड 3+3+3 पॅकेजसह येईल. म्हणजे त्यात १००,००० किलोमीटरसाठी ३ वर्षांची वॉरंटी, ३ वर्षे रोडसाइड असिस्टन्स आणि ३ लेबर-फ्री नियमित सर्व्हिस मिळतील. माय एमजी शिल्ड नुसार ग्लॉस्टर च्या ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार मालकीचे पॅकेजेस वैयक्तिकृत करता येतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!