पॅनोरमिक सनप्रूफसह सुरुवातीच्या १३.४८ लाख रुपयांत उपलब्ध
स्थैर्य, मुंबई, १३ : एमजी (मॉरीस गॅरेज) मोटर इंडियाने आज १३.४८ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरुवातीच्या मूल्यावर बहुप्रतीक्षित एमजी हेक्टर प्लस लाँच केली आहे. हेक्टर प्लस भारतातील पहिली ६ आसनी इंटरनेट एसयूव्ही असून ती पॅनोरमिक सनरूफसह येत आहे. तिची निर्मिती एमजी मोटरच्या गुजरात राज्यात वडोद-याजवळील हलोल येथील अत्याधुनिक निर्मिती प्रकल्पात केले जाईल.
एमजी हेक्टर परिवारातील नवा सदस्य असलेल्या या ६ आसनी हेक्टर प्लसमध्ये मधल्या रांगेत उत्कृष्ट आणि आरामदायी कॅप्टन सीट्स देण्यात आल्या आहेत. ६-सीटर एसयूव्ही ही नव्या ड्युएल-टोन स्मोक्ड सेपिया ब्राउन इंटेरिअरमुळे आतून खूप अपिलिंग लूक देते. नव्या स्टायलिश हेडलँप्ससह, एक नवे क्रोम-स्टडेड फ्रंट ग्रिल आणि आय-स्मार्ट नेक्स्ट जनरेशनसाठी चिट-चॅट फीचर यामुळे गाडीचे आकर्षण वाढले आहे. यात आणखी आकर्षक सुविधा असून त्यात नवे स्मार्ट स्वाइप, फ्रंट आणि रिअर बम्पर्स, न्यू रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिवाइज्ड स्किड प्लेट्स आहेत.
एमजी हेक्टरप्रमाणेच एमजी मोटर इंडियाने ग्राहकांना हेक्टर प्लसच्या रिसेल व्हॅल्यूचे आश्वासन दिले आहे. यासाठी कारनिर्माता कंपनीने ‘कारदेखो’ सोबत करार केला आहे. कार खरेदी करणारे “3-60”योजनेअंतर्गत तीन वर्षांच्या मालकीनंतर एमजी हेक्टर प्लस ६०% च्या किंमतीत खरेदी करेल, जिला ग्राहक अधिक आकर्षक किंमतीत खरेदी करू शकतील.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “ आम्ही एमजी मोटरसह २०१९ मध्ये भारतीय वाहन बाजारात प्रवेश केला होता. एमजी हेक्टरप्लसचे लाँचिंग हे आमच्या प्रवासातील एक नवे यश आहे. ती टॉप-नॉच प्रॉ़डक्ट आणि सुविधांसह ग्राहकांच्या सेवेत कटिबद्ध आहे. ६ आसनी इंटरनेट एसयूव्ही ही आमच्या सर्व ग्राहकांना एक उत्कृष्ट कौटुंबिक आनंदक्षण प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आधारीत उपलब्ध लक्झरी आणि कंफर्टचे मिश्रण आहे.”
एमजी हेक्टर प्लस आपल्या ग्राहकांना पुरेसा अनुभव प्रदान करण्यासाठी एमजी शील्ड आणि एमजी शील्ड+ प्रदान करते. एमजी शील्ड अंतर्गत, एमजी फ्री-तीन, ‘५एस’, म्हणजेच फ्री५-वर्ष/ अनलिमिटेड किमी वॉरंटी, फ्री ५-वर्षीय रोडसाइड असिस्टंस आणि पहिल्या ५ सर्व्हिससाठी फ्री लेबर चार्जचा विस्तार करण्यात आला आहे. ‘एमजी शील्ड’ अंतर्गत सर्व घटक एमजी ओनरशिपचा अनुभव वाढवणे तसेच एमजीच्या ग्राहकांना मन:शांती प्रदान करण्याच्या उद्देशाने दिलेले आहेत. ६ आसनी एसयूव्हीची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप(टीसीओ) या सेगमेंटमध्ये सर्वात कमी आहे. ही पेट्रोल व्हेरिएंटसाठी ४५ पैसे प्रति किलोमीटर आणि डिझेल व्हेरिएंटसाठी ६० पैसे प्रति किलोमीटर (१००,००० किलोमीटर वापराच्या आधारे करण्यात आलेली मोजणी) आहे. एमजी हेक्टर प्लस क्लासिक पॅकेजचा भाग म्हणून ३ वर्षांसाठी ८,००० रुपयांपासून सुरु होणाऱ्या सर्वात चांगल्या प्रीपेड मेंटेनन्स प्लॅन सादर करते.