दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । मुंबई । एमजी मोटर इंडियाने प्रोफेशनल गोल्फर त्वेसा मलिकसोबत सहयोगाची घोषणा केली आहे, ज्याद्वारे महिला सक्षमीकरणाला, तसेच खेळामधील महिलांना मदत करण्याप्रती आपला पाठिंबा दाखवला. याअगोदर ब्रिटीश कारमेकर खेलरत्न व अर्जुन पुरस्कार-प्राप्त दीपा मलिक, २०२० टोकिेयो पॅरालिम्पिक्समधील भारताच्या पहिल्या रौप्यपदक विजेत्या भाविना पटेल आणि गुजरातचे फूटबॉल रिवॉल्युशनिस्ट पटाण गर्ल्ससोबत सहयोग केला होता.
अत्यंत तरूण वयामध्ये त्वेसा यांनी २०१८ मध्ये विमेन्स गोल्फ असोसिएशन इंडिया (डब्ल्यूजीएआय) मध्ये पहिला प्रो क्रमांक मिळवला. एमजी मोटर इंडियासोबतच्या सहयोगाच्या माध्यमातून त्वेसा विविध स्पर्धा व चॅम्पियनशीप्समध्ये ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करतील. त्वेसा यांच्यासोबतचा तीन-वर्षांचा सहयोग एमजीच्या तरूण टॅलेण्टला प्रोत्साहन देण्यासोबत त्यांना प्रेरित करण्याच्या दिशेने पाऊल आहे.
एमजी मोटर इंडियाच्या विपणन विभागाचे प्रमुख उदित मल्होत्रा म्हणाले, “भारत ही अनेक प्रतिभांनी संपन्न भूमी आणि गोल्फसह लोकप्रिय खेळांचे घर आहे. खेळाप्रती तरूणांच्या (विशेषत: महिला) वाढत्या रूचीसह गोल्फमध्ये भारताला विशेषत: ऑलिम्पिक गेम्स २०२१ मध्ये चौथे स्थान मिळाल्यानंतर जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची क्षमता आहे. हा सहयोग खेळामध्ये युवा महिलांना प्रोत्साहित करण्याच्या आमच्या मुलभूत तत्त्वांशी संलग्न आहे.”
व्यावसायिक गोल्फर त्वेसा मलिक म्हणाल्या, “मला एमजी परिवाराचा भाग होण्याचा आनंद होत आहे. हा प्रतिष्ठित, क्लासिक ब्रिटीश ऑटोमोटिव्ह ब्रॅण्ड आहे, जो मी विकसित होताना पाहिला आहे. एमजी मोटर सारख्या कंपन्या खेळामधील महिलांच्या टॅलेण्टला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे पाहून चांगले वाटते. मला त्यांच्यासोबत या प्रवासाची सुरूवात करताना आनंद होत आहे आणि मी भारतातील अधिकाधिक महिलांना गोल्फ खेळ खेळण्यास प्रेरित करण्याची आशा करते.”
एमजी मोटर विशेषत: महिला व मुलींवर लक्ष केंद्रित करणा-या सामुदायिक व वैविध्यता-संचालित उपक्रमांसाठी ओळखली जाते. यापैकी काही उपक्रम मुलींचे शिक्षण, ड्राइव्ह हर बॅक, पटाण गर्ल्सनापाठिंबा आणि महिला कर्मचा-यांसाठी समर्पित वसतिगृहे आहेत.