दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२३ | सातारा |
जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) शाळेतील विद्यार्थ्यांनी दि. २ डिसें २०२३ रोजी सोलापूर येथे घेण्यात आलेल्या स्टेअर्स फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमधील धावणे या प्रकारात इतिहास रचला व शाळेचा नावलौकिक वाढवला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. सोनाली खरात – १०० मी. धावणे (प्रथम क्रमांक) व २०० मी. धावणे (प्रथम क्रमांक), कु. राजवीर गोरवे -२०० मी. धावणे (प्रथम क्रमांक), कु. सुरंजन नाळे – २०० मी. धावणे (द्वितीय क्रमांक) यांनी उत्तुंग यश संपादन केले.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व तरुण मंडळ सोनगाव, जि. प. शाळा राजाळा, ग्रामपंचायत सोनगाव, भैरवनाथ सेवा विकास सोसायटी, भजनी मंडळ यांचे वतीने सत्कार समारंभ आयोजित करून त्यांच्या यशाचा व जिद्दीचा गुणगौरव व सन्मान करण्यात आला. या वेळेस या विद्यार्थ्यांना हार, बुके नारळ व वह्या देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक धनंजय मोरे सर यांनी केले, सूत्रसंचालन नाळे सर यांनी केले. माजी सरपंच सोनगाव श्री. पोपटराव बुरुंगले, प्रा. राजेश निकाळजे व कार्यक्रमाचे अध्यक्ष रणवरे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमप्रसंगी सोनगावचे विद्यमान सरपंच ज्योत्स्नाताई जगताप, रमेश जगताप, बाबासो लवटे, दिलीप भंडारे, राजेंद्र आडके, रामहरी पिंगळे, संदीप पिंगळे, दत्तात्रय ननावरे, अमोल गोरवे, पवन भोसले, महेश जगताप, जालिंदर खरात, शाळेचे शिक्षक नानासो धायगुडे सर, अफसर बडगिरे सर, पुष्पा गायकवाड मॅडम व पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.