ग्रामपंचायत स्तरावर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रम होणार मोठ्या उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२३ । सातारा । स्वातंत्र्याचा का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या आहेत.

9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत  विविध कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर घ्यावेत. शिलाफलक या उपक्रमांतर्गत गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत )  या ठिकाणी शिलाफलकाची उभारी करण्यात यावी. शिलाफलकावर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बौद्ध चिन्ह, प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे (नावे उपलब्ध नसल्यास मातृभूमिची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांना शतश: नमन असे सामान्य वाक्य लिहावे, ग्रामपंचायतीचे नाव, दिनांक याबाबी नमूद करावयाच्या आहेत) शिलाफलकाची निर्मिती मनरेगाच्या माध्यमातून करण्यात यावी.

वसुंधरा वंदन या उपक्रमामध्ये गावातील योग्य ठिकाण निवडून वसुंधरा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करण्यात यावी. यासाठी रोप खरेदी, वृक्षारोपण कार्यक्रम याबाबतचा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करण्यात यावा. या उपक्रमासाठी आवश्यक रोपे उपलब्धताबाबत खात्री करुन घ्यावी.

पंच प्रण (शपथ घेणे) या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी पंच प्रण (शपथ) घ्यावी. हातात दिवे लावून पंच प्रण शपथ घेण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीच्या दिव्यांची पुरेशी व्यवस्था करावी, हे दिवे रास्तधान्य दुकानातही खरेदीसाठी उपलब्ध करुन द्यावे.

ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत गाव क्षेत्रातील (अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात यावा. संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा लोकसहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी करावा. या कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 1 किंवा 2 मूठ माती घेवून सन्मानपूर्वक पंचायत समितीस्तरावरील समन्वयक अधिकारी, नोडल अधिकारी यांच्याकडे सोपवावी.   सर्व उपक्रम राबविण्याबाबत कृती आराखडा कार्यक्रमाआधी विशेष ग्रामसभा घेवून याबाबत ठराव करण्यात यावा. 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे नियमित झेडावंदन कार्यक्रम होईल.

16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तरावर माती कलाशामध्ये गोळा करणे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करावी. या कलाशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव पेंटकरुन किंवा रेडियमने लिहावे. हा मातीचा कलश 27 ते 30 ऑगस्ट 2023 या दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेवून जाण्यास एका युवकाची निवड करावी. याकरिता नेहरु युवा केंद्र, युवक कल्याण विभागाचे सहाय्य घ्यावे.

मागील वर्षी संपूर्ण राज्यात हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला होता. या धर्तीवर 13 ते 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत हरघर तिरंगा (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबविण्यात येणार आहे. मागील वर्षी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत नागरिकांना ध्वज व्यवस्थित जनत करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या ते ध्वज परत वापर करुन शकतील. गरजेप्रमाणे तालुका, जिल्हा, विभागस्तरावर शिल्लक चांगल्या तिरंगा ध्वजांचे ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात यावे. तसेच गरजेप्रमाणे स्थानिक स्तरावरुन महिला बचत गट, विक्रेते यांच्याकडू तिरंगा झेंडे उपलब्ध करुन घ्यावेत व हर घर तिरंगा उपक्रमाचे नियोजन करावे.

ग्रामपंचायतस्तरावर मेरी मिट्टी मेरा देश अभियान उत्साहात साजरे करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलाने यांनी सूचना केल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!