दैनिक स्थैर्य | दि. १ जानेवारी २०२५ | फलटण |
देवस्थान इनाम प्रश्न आणि मुंबई पब्लिक अॅक्ट ट्रस्टमधील जाचक कलमांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांची मुंबईत शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे देवस्थान ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य) चे सातारा जिल्हाध्यक्ष महेश साखरे, अध्यक्ष विजय पोरे, उपाध्यक्ष बंडोपंत गुरव यांनी भेट घेऊन चर्चा केल्यावर त्यांनी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले व लवकरच विधेयक तयार होणार आहे, असे सांगितले.