झेडपी अध्यक्षपदासाठी शुक्रवारी सभा

दुपारी एक वाजेपर्यंत होणार निवडी


स्थैर्य, 18 मार्च, सातारा : जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २०) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता प्रक्रिया सुरू होणार असून, एक वाजेपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे.
जिल्हा परिषदेत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने कोणाची सत्ता येणारं ? कोण अध्यक्ष, उपाध्यक्ष होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्हापरिषदेत सध्या भाजप २८, राष्ट्रवादी २१, शिवसेना १५, काँग्रेस एक असे संख्याबळ आहे. बहुमताचा ३३ चा आकडा गाठण्याचे आव्हान पक्षांपुढे आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर लढले होते, तर दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित सामोरे गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येणार की भाजपला सामावून घेतले जाणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे.
अशी होणार प्रक्रिया …
जिल्हा परिषदेच्या छापती शिवाजीमहाराज सभागृहात सभेचे आयोजन केले आहे. सकाळी ११ ते ११.३० या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याकडे सादर करायची आहेत. ११ ते ११.३० या वेळेत विशेष सभेच्या अनुषंगाने कोरम, स्वाक्षरी आदींची तपासणी होणार आहे. दुपारी ११.३१ ते १२ यावेळेत अर्जाची छाननी होणार आहे. १२.०१ ते १२.३० या वेळेत अर्ज माघारी घेता येतील. दुपारी १२.३१ नंतर आवश्यक असल्यास मतदान घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!