दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । सातारा । राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा नियोजन व कोल्हापूर येथील सांगता समारोपाच्या नियोजनासाठी ‘राष्ट्रवादी भवन सातारा’ येथे बैठक पार पडली. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी जिल्ह्यतील राष्ट्रवादीचे संघटन बळकट करून घरोघरी आदरणीय पवारसाहेबांचे विचार पोहचवणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्या लहानात लहान कार्यकर्त्याना ताकद देणे याविषयी चर्चा झाली.
१७ एप्रिल रोजी सातारा येथे होणाऱ्या परिवार संवाद यात्रेचे नियोजन करून २३ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या परिवार संवाद यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात आले. बैठकीस विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळसाहेब पाटील, आ शशिकांत शिंदे. जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्व सेल जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.