मीडियाची संवाद साधने आणि स्वसंवाद ऑनलाइन चर्चासत्र संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दहिवडी, दि. १० : ब्रह्माकुमारीज् वडूज जि. सातारा तथा मीडिया प्रभाग, राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू यांचे वतीनं “मीडियाची संवाद साधने व स्वसंवाद” या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार व माध्यमकर्मीसाठी ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात ब्रह्मकुमारी संस्थेचे राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य, जळगांव, उत्तर महाराष्ट्र, तथा मीडिया विंग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे मुख्य संबोधक, कार्यक्रम अध्यक्षा ब्रह्माकुमारी सुनंदादीदी, उपक्षेत्रिय निर्देशिका ब्रह्माकुमारीज् उपक्षेत्र पुना, कार्यक्षेत्र कोल्हापूर तर खटाव तालुक्याच्या वतीनं माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा बंडा गोडसे, खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर व नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष डॉ विनोद खाडे यांनी सक्रीय सहभाग घेतला.

आज आपण मीडियाच्या नवीन व आधुनिक संवाद साधनांनी सुपरिचित आहोत. ज्यात मोबाईल, सोशल मीडिया, वेब आदिंचा समावेश होतो. खरे तर ही संवाद साधने म्हणून ओळखली जातात. परंतु त्यांनी प्रत्येकाच्या मनाचा ताबा निश्चितपणे मिळविला आहे. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि सायबर प्रत्येक मीडियाच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल होवून संवादाच्या नवीन साधनांची नित्य भर पडत आहे. या नवसाधनांच्या भाऊगर्दीत ‘संवाद’ वाढला मात्र ‘स्वसंवाद’ कमी झाला हे नाकारुन चालणार नाही.सद्य परिस्थितीत मीडियाची ही नवीन साधने तर हाताळावी लागतीलच परंतुच्या या नवीन प्रवाहात स्वसंवाद आणि सुसंवाद नित्य होणे गरजेचे आहे. नव्हे मानसिक स्वास्थ्यासाठी तर हे अत्यावश्यकच आहे. यावेळी प्रा वडणेरे व सुनंदा दीदी यांनी मार्गदर्शन केले.

राजयोग मेडिटेशन:ब्रह्माकुमारी शोभा बहनजी, संचालिका इस्लामपूर सेवाकेंद्र यांनी केलं.झूम व यु ट्यूब माध्यमातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजनब्रह्माकुमारी राणी बहनजी ,संचालिका, ब्रह्माकुमारी वडूज सेवाकेंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास राज्यातील बहुसंख्य माध्यम कर्मींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची कोरोना काळात आवश्यकता असून या बाबत प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था अतिशय चांगले उपक्रम राबवित असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!