डोंबाळवाडीचे सुपुत्र माऊली सूळ यांची LIC मध्ये वर्ग-१ पदी निवड


स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : तालुक्यातील डोंबाळवाडी येथील सुपुत्र माऊली विजय सूळ यांची भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) सहाय्यक प्रशासन अधिकारी (वर्ग-१) पदी पदोन्नतीने निवड झाली आहे. त्यांची नियुक्ती सुरत, गुजरात येथे झाली आहे.

माऊली सूळ हे सध्या एलआयसीच्या विटा शाखेत सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी एलआयसीमध्ये पाच वर्षांची सेवा पूर्ण केली असून, यापूर्वी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक आणि आयडीबीआय बँकेत कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनवडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी पुणे येथील वाडिया इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आणि एमएमआयटी कॉलेजमधून बी.टेक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!