दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२३ | फलटण |
भाडळी बु. (ता. फलटण) येथील सर्वसामान्य शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून नव्याने स्थापन झालेल्या मातोश्री विकास सेवा सोसायटी मर्या., भाडळी बु. च्या वतीने यावर्षीच्या आर्थिक वर्षातील पीक कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा शाखा दुधेबावी येथे नुकताच संपन्न झाला.
भाडळी बु. येथील शेतकर्यांना विकास अधिकारी श्री. आप्पासाहेब गावडे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष श्री. हनुमंतराव सोनवलकर-पाटील, शाखाप्रमुख श्री. यु. पी. बनकर साहेब, संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. मोहनराव डांगे यांच्या हस्ते यावेळी कर्ज रकमेचा धनादेश देण्यात आला.
यावेळी बँकेचे कॅशियर श्री. आर. सी. सस्ते साहेब, कर्मचारी श्री. एन. एम. गायकवाड यांच्यासह भाडळी बु. चे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. वसंतराव डांगे, श्री. राजेंद्र माने, भाडळी खु.चे माजी सरपंच श्री. रखमाजी पिसाळ, श्री. तानाजी सावंत, श्री. रमेश डांगे, ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळी बु.चे अध्यक्ष हभप स्वप्नील महाराज शेंडे, विकास सोसायटीचे सचिव श्री. सचिन सोनवलकर, संस्थेचे संचालक यांच्यासह भाडळी बु. गावातील शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
संस्थेच्या स्थापना प्रक्रियेपासून ते बँकेच्या पतधोरणाला अनुसरून कर्जवाटप होईपर्यंत अनेकांचे अनमोल सहकार्य मिळाल्याचे संस्थापक चेअरमन श्री. मोहनराव डांगे यांनी यावेळी सांगितले. संस्थेचे कामकाज विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. दिपक चव्हाण तसेच जि.प. साताराचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून बँकेच्या सर्व योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी सहायक निबंधक सहकारी संस्था फलटण श्री. सुनिल धायगुडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय विकास अधिकारी श्री. निंबाळकर, निवृत्त उपव्यवस्थापक प्रशासन विभाग श्री. विश्वासराव परकाळे, निवृत्त विभागीय विकास अधिकारी श्री. अविनाश खलाटे, विक्री अधिकारी श्री. ढेंबरे, पं.स.चे माजी सदस्य श्री. सचिन रणवरे, माजी उपसरपंच श्री. दत्तात्रय डांगे, ग्रामपंचायत सदस्य अनुक्रमे श्री. सचिन शिरतोडे, श्री. मंगेश माने, सहायक निबंधक सह. संस्था कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकार्यांनी संस्थेच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.