दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
भाडळी बु., ता. फलटण येथील मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सन २०२४ या वर्षाच्या दिनदर्शिकेचा उपक्रम स्तुत्य आणि अभिनंदनीय असल्याचे मत फलटणचे सहाय्यक निबंधक श्री. जे. पी. गावडे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या वतीने प्रथमच तयार केलेल्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.तत्पूर्वी फलटण येथे नव्याने सहाय्यक निबंधक या पदावर बदली झालेबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून काम करत असलेल्या संस्थेने केवळ शेती कर्जपुरवठा करण्याबरोबरच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व योजनांची माहिती या दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट केली आहे. शेतकरी बांधवांना यांचा निश्चित फायदा होईल. संस्थेने अल्पावधीत केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. यापुढील काळात संस्थेला सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. मोहनराव डांगे, झिरपवाडीचे माजी सरपंच श्री. एम. एस. गुंजवटे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त फलटण तालुका अध्यक्ष श्री. जयकुमार इंगळे, तामखडाचे माजी सरपंच श्री. तुळशीदास शिंदे, फलटण दुध संघाचे संचालक श्री. राजकुमार बाबर, सोनवडी सोसायटीचे व्हा.चेअरमन श्री. सचिन सूर्यवंशी, ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. स्वप्नील महाराज शेंडे, सचिव संघटनेचे श्री. पांडुरंग माने यांच्यासह निबंधक कार्यालयातील श्री. सुनील गरुडकर, श्री. शेखर साळुंखे, श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्री. चव्हाण तसेच संस्थेचे सचिव, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.