शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ | सातारा | शहीद वीर जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर आज खटाव तालुक्यातील वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराच्या ठिकाणी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, प्रांताधिकारी उज्वला गाडे, प्रभाकर देशमुख, तहसीलदार बाई माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी मनीषा, आई किशाबाई, वडील महादेव, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती, भाऊ हिराचंद यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा श्रेयस यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!