स्थैर्य, दि.१६: कर्नाटकातील मराठी बांधवांसाठी
सरकारकडून मराठी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आगामी होऊ घातलेल्या बसवकल्याण
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली. या प्राधिकरणासाठी कर्नाटक
राज्याच्या अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे
सीमाभागातील मराठी बांधवांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या
प्राधिकरणाकडून मराठी बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक
विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
कर्नाटकच्या
बसवकल्याण विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच पोटनिवडणूक होत आहे. या
मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ही घोषणा केल्याचे समजते.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सीमाभागातील जनतेला पाठिंबा
बेळगावसह
संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर
रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी
महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळाने यंदा 1 नोव्हेंबर रोजी
काळ्या फिती बांधून कामकाज केले होते.