मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये : फलटण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी संपूर्ण राज्यभर मराठा समाजाच्या वतीने केली जात आहे. या मागणीला सर्व ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. सध्या ओबीसी कोट्यातून अनेक जाती-जमातींना आरक्षण दिले जात असल्याने या प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण देऊ नये, असे निवेदन फलटण तालुका ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने फलटण तहसिलदार अभिजीत जाधव यांना देण्यात आले.

मराठा समाज आरक्षण मागणीप्रसंगी आंदोलन मेळावा व जनजागृतीवेळी वारंवार ओबीसी समाज, ओबीसी नेते, महापुरूष व कार्यकर्त्यांवर व्यक्तिगत व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केले जाऊ नये, असे ओबीसी आरक्षण संघर्ष समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आज फलटण येथे होणार्‍या मराठा आरक्षणाबाबत होणार्‍या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणांचा मागील इतिहास पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या असून आता यापुढे अशी वक्तव्ये ओबीसी समाज सहन करणार नाही. असे झाल्यास ओबीसी तीव्र आंदोलन करतील, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी डॉ. बी. के. यादव, काशिनाथ शेवते, दशरथ फुले, बापूराव शिंदे, बाळासाहेब ननावरे, गोविंद भुजबळ, अमिरभाई शेख, रणजित भुजबळ, विकास शिंदे, बाळासाहेब काशिद, विजय शिंदे, बापूराव काशिद, अमोल रासकर, माधव जमदाडे, शरद कोल्हे, विवेक शिंदे, व्यंकटराव दडस, नितीन सूळ, गिरीश बनकर, संतोष ठोंबरे, दीपक शिंदे, कृष्णाथ नेवसे, डी. वाय. शिंदे, अंबादास दळवी, वैभव नाळे, बंडू शिंदे, राहुल शिंदे, नाना नाळे, रणजित नाळे, प्रशांत शिंदे, अमोल शिंदे, आप्पा पिसाळ, प्रवीण फरांदे, रमेश नाळे, नंदकुमार कचरे, रोहन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!