दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण | केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना ह्या सर्वसामान्य घटकासाठी आहेत. परंतु या योजनांसाठी पात्र लाभार्थी मिळत नसल्याची खंत मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी व्यक्त केली. यावेळी इतर मागास कल्याण विभागाचे निरीक्षक सुनील करचे यांनी इतर मागास कल्याण विभागाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या विविध योजनांची माहिती देत विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
राज्य शशांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग सातारा, पाच पांडव आश्रमशाळा अलगुडेवाडी व मुधोजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुका स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला महामानवांच्या प्रतिमाचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
पाच पांडव माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. धुलगुडे यांनी केले तर आभार प्रा. सागर निकम यांनी मानले.
कार्यक्रमास कॉलेजचे विध्यार्थी पालक लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.