
दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मंथन वेलफेअर फाऊंडेशन संचलित, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ चा बक्षीस वितरण समारंभ फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात ११ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. मंथन परिक्षेत राज्य, जिल्हा, विभाग, तालुका गुणवत्ता यादीमध्ये मिळविलेल्या मुलांचा यावेळी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंथन राज्यस्तरीय परीक्षेत मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटणची चौथीची विद्यार्थिनी वैभवी विपुल दोशी हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
वैभवीने ३०० पैकी २७६ गुण (९२ टक्के) मिळवून हे यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.